आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वृद्धावस्थेत हाडे कमजोर होणे, रक्तदाब, नेत्ररोग असे विविध आजार बळावतात. मात्र, यामध्ये सर्वाधिक त्रासदायक आजार आहे सांधेदुखी. तारूण्यात योग्य काळजी न घेतल्याने ही समस्या वृद्धावस्थेत जास्त त्रासदायक ठरते. यामुळे चालणे, फिरणे सुद्धा अशक्य होते. सांध्यामधील वेदना असह्य होतात. वृद्धावस्थेतील हा त्रास टाळायचा असेल तर आतापासूनच तरूणांनी योग्य ते उपाय केले पाहिजेत. तारूण्यात पादोत्तानासन सारखे आसन केल्यास वृद्धावस्थेत हा त्रास जाणवणार नाही.
असे करा आसन
१ सर्वप्रथम ताडासनामध्ये उभे राहा.
२ दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा आणि हात कमरेवर ठेवा.
३ हात कमरेपासून पुढच्या बाजूने जमिनीवर टेकतील असे झुकवा.
४ हात आणि पाय एकदम सरळ ठेवा. हातांमध्ये खांद्या इतके अंतर ठेवा.
५ या अवस्थेत हात वाकलेले असतात, पण पाय एकदम सरळ ठेवा.
६ या स्थितीत १० ते १५ सेकंदांपर्यंत राहण्याचा प्रयत्न करा. हळूहळू वेळ वाढवा.
७ पूर्वस्थितीत येताना श्वास घेत डोके आणि पाठ एकाच वेळी उचलत वरच्या दिशेने या.