हे आहेत खास फायदे
* ऑलिव्ह ऑइलमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते, हा गैरसमज आहे. ऑलिव्ह ऑइलने वजन वाढत नाही तर कमी होते. ऑलिव्ह ऑइल जास्त काळापर्यंत भूक नियंत्रणात ठेवते. या तेलामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होते, असे एका संशोधनात आढळून आले आहे.
* ऑलिव्ह ऑइल स्ट्रेच मार्क दूर करून त्वचा निरोगी ठेवते. तसेच सुरकुत्या पडलेली त्वचा पूर्वीप्रमाणे होते.
* ऑलिव्ह ऑइलमध्ये फाइटोन्यूट्रिएंट्स ओलेकॅथल तत्त्व असतात. ही तत्त्व इबोप्रूफेनप्रमाणे वेदानेमध्ये आराम देतात. या तेलाच्या वापराने वेदना, सूज, जळजळ कमी होते. या तेलामध्ये काही ऑलेइक एसिड तत्त्व असतात, ज्यांमुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. तसेच स्किन कॅन्सरपासूनही संरक्षण होते, असे एका संशोधनात आढळून आले आहे.
* अॅसिडीटीचा त्रास असल्यास ऑलिव्ह ऑइल डायटमध्ये घ्यावे. यामुळे पचनतंत्राला आराम मिळतो. अॅसिडीटीचा त्रास कमी होतो. पोटात गॅस होत असल्यास हा त्रास सुद्धा दूर होतो.
* हृदयविकार आणि यकृतांच्या रुग्णांसाठी हे तेल जास्त सुरक्षित आहे. यातील व्हिटॅमिन ई त्वचा आणि डोळ्यांसाठी लाभदायक आहे. शरीरातील चरबीला नियंत्रणात ठेवते.
* केसांच्या विविध प्रोडक्ट्समध्ये ऑलिव्ह ऑइल असते. यामुळे केस मजबूत, आणि चमकदार होतात. हे तेल गरम करून केसांना लावल्यास केस मजबूत होतील.
* ऑलिव्ह ऑइलला मॉइश्चरायजर प्रमाणे वापरता येते. हे तेल शुष्क त्वचेवर लावल्यास त्वचा मॉइश्चरायज्ड होते. शरीरावर एखाद्या क्रीम प्रमाणे हे तेल लवता येते. हे तेल फेसपॅक स्वरुपात सुद्धा वापरात येते.