आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ज्येष्ठ मध आपल्या रोजच्या जीवनात आपण वापरत असतो. पण अशाच जेष्ठ मधाचे गुणकारी फायदे माहित आहे का तुम्हाला ? जेष्ठ मधाचा वापर आपण डोळे, तोंडाचे आजार, हृदयाचे आजार, श्वासाचे आजार तसेच जखमांवर औषध म्हणून करू शकतो. ज्येष्ठमधा मध्ये ग्लिसरायजीक ॲसीड, कॅल्शियम, अँटी बायोटिक, अँटी ऑक्सिडंट, प्रोटीन असे अनेक उत्तम गुणांचा यात समावेश आहे. कफ, पित्त आणि वात या तीन दोषांवर उपचारासाठी ज्येष्ठमध फार गुणकारी ठरते.डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी दररोज संध्याकाळी बडीशेपचे चूर्ण आणि जेष्ठमधाचे चूर्ण एकत्र करून खाल्याने उत्तम परिणाम पाहायला मिळतील.
ज्येष्ठमध कान आणि नाकाच्या आजारांवरही गुणकारी आहे. कानाचे आजार दूर करण्यासाठी दुधात ज्येष्ठमध आणि द्राक्षे शिजवून ते दुध कानात टाकल्याने कानाचे आजार दूर होतात. कित्येक लोकांना हे ठाऊकच असेल तोंड आल्यास ज्येष्ठमधाच्या काड्या मध लावून चाटल्याने फायदा होतो. तसेच खोकला आणि घशाचे आजार दूर करण्यासाठी ज्येष्ठमध चघळू शकता. ज्येष्ठमधाच्या काड्या चघळल्याने उचकी दूर होते.