आरोग्यानामा ऑनलाईन टीम : भेंडीची भाजी काही लोकांना आवडत नाही, परंतु, जर तिच्यातले गुणधर्म समजले तर ही भाजी कुणीही टाळू शकणार नाही. ही भाजी चविष्ट व पोषक असते. भेंडीची सुकी भाजी, भेंडी मसाला, भेंडी फ्राय आणि भेंडी पुलाव असे भेंडीचे विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. भेंडीचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ पचन चांगले होते.
२ शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. मधुमेह नियंत्रित राहतो. इन्सुलिनचा स्राव वाढवते.
३ कॅन्सरच्या पेशींमध्ये वाढ करणारे फ्री रॅडिकल्स नष्ट होतात.
४ पचनक्रिया सुधारल्याने आतड्याच्या कॅन्सरची शक्यता कमी होते.
५ वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
६ रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. हृदयविकाराचा धोका टाळता येतो.
७ रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते.
८ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते.
Visit : arogyanama.com