आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही भागात भेंडीचा उपयोग विविध आजारांवरील उपचारासाठी औषधाप्रमाणे केला जातो. भेंडी खाण्याचे काही खास फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी भेंडी खाणे परिणामकारक ठरते. सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खावी. भेंडीमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांसोबतच व्हिटॅमिन ए, बी, सी, ई व के तसेच कॅल्शिअम, लोह, जस्त असते. तसेच जास्त प्रमाणात फायबरसुध्दा असते.
हे आहेत फायदे
* नपुंसकता दूर करण्यासाठी पुरुषांनी कच्ची भेंडी चावून खावीत. शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी भेंडीचा वापर करतात.
* कच्ची भेंडी चावून-चावून खाल्ल्यास वीर्य आणि शुक्राणूमध्ये वृद्धी होते.
* पाच कापलेल्या भेंड्यांमध्ये लिंबाचा अर्धा चमचा रस, डाळींब आणि आवळ्याची पाने ५-५ ग्रॅम इत्यादी रात्रभर १ ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी या सामग्रीचे चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून घ्या. दररोज दोन वेळा सलग सात दिवस याचे सेवन करावे. या उपचाराने कावीळसारखा आजार एका आठवड्यात बरा होतो. ताप आणि सर्दी-खोकल्यावरही हा एक चांगला रामबाण उपाय आहे.
* मधुमेहाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी भेंडीची थोडी कच्ची भाजी खाणे आवश्यक आहे. ताजी हिरवी भेंडी डायबेटीज रुग्णांसाठी खुपच फायदेशीर आहे.