आरोग्यनामा ऑनलाईन टीम – केशरचा उपयोग आपण खरे तर पदार्थाला सुवास देण्यासाठी आणि पदार्थाना रंग येण्यासाठी केला जातो. पण खास पदार्थांचा रंग आणि स्वाद वाढविण्याशिवाय केशराचा उपयोग त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठीही केला जातो. त्वचेवरील डाग घालवून त्वचा सुंदर बनविण्यासाठी केशराचा उपयोग प्राचीन काळापासून चालत आला आहे. केशराचे त्वचेसाठी असणारे फायदे अनेक आहेत. तसेच केशर हे अनेक आजारांवर फायदेशीरही आहे.
केशरचे उपयोग खालीलप्रमाणे –
१) कर्करोगाचा धोका कमी :
शरीरात ट्युमरची निर्मिती किंवा ट्युमर वाढ कमी होण्यास केशर उपयुक्त आहे. स्किन कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी केशर चांगले कार्य करते. केमोथेरपीमुळे होणारे साईड इफेक्ट्स म्हणजेच वजन कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे यावर मात करण्यासाठी केशराचा फायदा होतो. केशराचे नियमित सेवन केल्यास शरीरातील व्हिटॅमिन ‘ए’ चे प्रमाण वाढते.
२) हृदययासाठी फायदेशीर :
केसरामुळे रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आणि बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. परिणामी हृदयविकारांना आळा बसतो. तसंच उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर केशरामुळे हृदयाचे आरोग्य जपले जाते.
३) समरणशक्ती वाढवण्यासाठी:
स्मुर्ती वाढवण्यासाठी केशराचा उपयोग होतो. अल्झायमर सारख्या आजरांना प्रतिबंध करण्याचा केशर हा नैसर्गिक उपाय आहे. वयोमानानुसार येणारा विसराळूपणा कमी करण्यासाठी केशराची मदत होते.
४) डोळ्यांच्या समस्या दूर करते :
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास डोळ्यांचा रॅटीना खराब होऊ शकतो. केशरात कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे या समस्येला प्रतिबंध होईल.