आरोग्यानामा ऑनलाइन टीम – खसखसमध्ये ओमेगा ३ आणि ओमोगा ६ हे तत्व असतात. तसेच फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, थायमिन, कॅल्शिअम आणि मॅगनीज हे सुद्धा असतात. अशी पोषकतत्व असणारी चिमुटभर खसखस जर दुधात टाकून प्यायल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. हे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ चांगली झोप लागते. निद्रानाशाची समस्या दूर होते.
२ पोटाच्या समस्या दूर होतात.
३ हायब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे.
४ डिप्रेशनचा त्रास कमी होतो.
५ रक्ताची कमतरता दूर होते.
६ गरमीच्या दिवसात शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
७ थंडीत सर्दी-खोकला दूर होतो.
८ वजन कमी होते.
९ अंगदुखीपासून आराम मिळतो.
१० श्वासाच्या समस्यांपासून आराम मिळतो.