आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पायांचे तळवे हा शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण शरीरातील विविध अवयवांशी संबंधीत नसा पायाच्या तळव्यापर्यंत आलेल्या असतात. शरीराला आराम मिळण्यासाठी आणि रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी अनेकजण संपूर्ण शरीराचा मसाज करतात. परंतु, पायाच्या तळव्यांचा मसाज केल्यास खुप फायदे होऊ शकतात. यामुळे कोणते फायदे होतात, याविषयी जाणून घेवूयात.
असे करा मसाज –
* एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यामध्ये इंसेशियल तेलाचे दोन ते पाच थेंब टाका. या पाण्यात पंधरा ती वीस मिनिटे पाय बुडून ठेवा. नंतर पाय टॉवेलने पुसून घ्या. यानंतर कोमट तेलाने पायाची मसाज करा.
हे आहेत फायदे
१) यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. निवांत झोप येते.
२) पायांची मसाज केल्याने पायांना भेगा पडत नाहीत आणि पाय सुंदर होतात.
३) रात्री पायाची मसाज केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर होतो.
४) पायांची मसाज केल्याने कंबरेच्या खालच्या भागाच्या वेदनांपासून आराम मिळतो.