खजुरात आरोग्यवर्धक घटक मोठ्या प्रमाणात असतात. ग्लुकोज, फळातील साखर याचे प्रमाण असल्याने त्याचा शरीराला लाभ होतो. दोन ते चार खजूर खाल्ले तर शरीराला उर्जा मिळते. कमी वजन तसेच देहयष्टी किरकोळ असल्यास खजूराचे नियमित सेवन करावे. व्हिटॅमिन आणि प्रोटीन यामध्ये जास्त असल्याने वजन वाढण्यास मदत होते. अशक्त व्यक्तींनी रोज ४ ते ५ खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन वाढू शकते.
हे आहेत इतर फायदे
हाडे मजबूत होतात
खजूर खाण्यामुळे हाडे मजबूत होतात. यामध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
कफ कमी होतो
अपचनाचा, कफाचा त्रास याच्या सेवनाने बरा होतो. फायबर्सचे प्रमाण खजुरामध्ये जास्त असल्याने पचन चांगले होते. रात्री चार खजूर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी खावेत. काही दिवसांत याचा फायदा दिसून येतो.