आरोग्यानामा ऑनलाईन टीम – नैसर्गिक काळ्या मीठात सुमारे ८० उपयोगी मिनरल्स असतात. पूर्वी अनेक औषधी तयार करण्यासाठी याचा वापर केला जात होता. निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी काळ्या मीठाचे पाणी पिणे लाभदायक ठरते. यामुळे लठ्ठपणा, अपचनासारख्या अनेक समस्या दूर होतात. काळ्या मीठाच्या पाण्यामुळे अनेक आरोग्य फायदे होत असल्याने यास सोल वॉटर असेही म्हटले जाते.
असे तयार करा
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा काळे मीठ टाका. हे मिश्रण चांगले हालवून घ्या. आता सोल वॉटर तयार झाले आहे. हे उपाशीपोटी प्यावे.
हे आहेत फायदे
१ वजन कमी होईल
२ डायजेशन सुधारले
३ त्वचा निरोगी होईल
४ हाडे मजबूत होतात
५ गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
६ पोट फुगणार नाही
७ डोळ्यांची शक्ती वाढेल
८ केस दाट होतील
९ हृदय निरोगी राहिल
१० डायबिटीज नियंत्रणात राहिल