आरोग्यानामा ऑनलाईन टीम : काही लोकांना शेपूची भाजी आवडत नाही. शेपूचे नाव काढले की त्यांचे तोंड वाकडे होते. परंतु, शेपूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे जर अशा लोकांना कळले तर ते कधीही शेपूची भाजी टाळणार नाहीत. म्हणून कुणीही शेपूच्या नावावर न जाता त्याचे गुणधर्म पहावेत. या भाजीचे इंग्रजी नाव डिल आहे. डिल हे नाव जुन्या जर्मन भाषेतील डिला या शब्दावरून पडले आहे. डिला चा अर्थ जोजवणे किंवा शांत करणे असा आहे.
हे आहेत शेपूचे फायदे
१ शेपूच्या नियमित सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो.
२ कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते.
२ हृदयरोग रोगांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
शेपूचे महत्त्व
* ग्रीक लोकांत शेपू दारी असणे हे ऐश्वर्याचे लक्षण मानले जाते.
* चाल्र्स द ग्रेट मेजवानीच्या वेळेस शेपूच्या काढ्याच्या कुप्या टेबलावर ठेवत असे. कुणालाही उचकी लागली की हा काढा पीत असत.
Visit : arogyanama.com