आरोग्यनामा ऑनलाईन टीम – खजुरामध्ये ग्लोकोजचे प्रमाण तसेच कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अनेक आहारतज्न आणि डॉक्टर रुग्णांना खजूर खाण्याचा सल्ला देतात. तसेच यातील लोह, खनिज, फॉस्फरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो.
खजूरचे खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे :
१) तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर वजन वाढविण्यासाठी खजूर मदत करतो. व्हिटॅमिन आणि प्रोटीन (प्रथिने) जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठी याची मदत होते.
२) खजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असते.
३) खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यवर्धक मात्रा असतात. त्यामुळे खजूर खाल्याने शरीराला अनेक लाभ होतात.
४) खजूर खाणे हे आपल्या त्वचेसाठी खूप फायद्याचे आहे. खजूर खाण्यामुळे चेहरा तेजस्वी होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
५) अनेकांना कपचा त्रास असतो. तुम्हाला जर कफवर नियंत्रण मिळवायचे असेल तर खजूर खा कारण यामध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे खजुरच्या सेवनाने कफ नियंत्रणात येण्यास मदत होते.