आरोग्यानामा ऑनलाईन टीम : कपिंग थेरपी ही वेदनादायक असली तरी त्वचेसाठी लाभदायक असते. तसेच तिचे शरीरासाठीही अनेक फायदे असतात. यामुळे अनेक सेलिब्रिटींनी ही थेरपी आतापर्यंत करून घेतली आहे. या थेरपीमध्ये काचेचे छोटे कप गरम केले जातात. त्यानंतर ते पाठिवर ठेवून खेचले जातात. त्यामुळे शरीराच्या मांसपेशींना आराम मिळतो. कपिंग थेरपीचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
1 सर्दी, खोकला आणि अॅलर्जी ठिक करण्यासाठी कपिंग थेरपी प्रभावी ठरते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते.
2 कपिंग शेरपीमुळे शरीरातील गाठी ठिक करून सूज कमी करण्यासाठी मदत होते.
3 ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यास मदत होते. रक्तातील विषारी पदार्थ नष्ट करून दूषित तत्व बाहेर निघतात. नवीन आणि शुद्ध रक्त तयार होते. आजारांपासून बचाव होतो.
4 मायग्रेनच्या वेदना, पाठदुखी, मानेच्या वेदनांपासून आराम मिळतो. कोणत्याही प्रकारच्या वेदनांमध्ये फायदा होतो.
Visit : arogyanama.com