आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नॉनव्हेज आहारातून जे प्रोटीन्स मिळतात, ते शाकाहारी लोकांना न मिळाल्याने अनेकदा काही आरोग्य समस्या निर्माण होतात. यासाठी काहींना सप्लिमेंटसुद्धा घ्यावी लागतात. यासाठी नॉनव्हेज खात नाही, त्यांना काबुली चना सर्वात चांगला पर्याय आहे. शंभर ग्रॅम काबुली चन्यामध्ये एकोणीस ग्रॅम प्रोटीन्स असते. वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर असते. याचे अन्य फायदे जाणून घेवूयात.
वजन
हे मोड आल्यानंतर खावेत. वजन कमी होते. यात फायबर भरपूर असते.
दात
यामध्ये फॉस्फरस भरपूर असते. यामुळे दात मजबूत होतात. उकडलेल्या काबुली चण्यात मीठ टाळून खावे.
हृदयरोग
हे कोलेस्टेरॉल कमी करते. यामुळे हृदयरोग होत नाही. उकडलेल्या काबुली चण्यात थोडा लेमन ज्यूस टाकून खा.
कँसर
यातील फायटोन्युटरियन्स कँसरपासून बचाव करतात. याची भाजी बनूवन खावी.
डायबिटीज
याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामुळे डायबिटीज होत नाही. रोस्ट करून खावेत.
युरिन प्रॉब्लेम
यामध्ये डाययुरेटिक गुण असतात. यामुळे युरिन प्रॉब्लेम होत नाहीत. याचे पीठ चपातीच्या पीठात मिसळून चपाती खावी.
रक्तदाब
यातील मँगनीज रक्ताभिसरण व्यवस्थित करते. यामुळे रक्तदाबाची समस्या होत नाही.
अॅनिमिया
यामध्ये आयर्न भरपूर असल्याने रक्ताची कमतरता भरून निघते. अॅनिमिया होत नाही. यामुळे मसल्स मजबूत होतात. प्रेग्नेंसीमध्ये हे लाभदायक आहे.