आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तोंड सतत बंद राहून तोंडाची दुर्गंधी येऊ नये म्हणून अनेकजण च्युइंगम चघळतात. च्युइंगम चघळण्याचे इतरही अनेक फायदे असून च्युइंगम आरोग्यासाठीसुध्दा फायदेशीर ठरते. याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे आहेत फायदे
* च्युइंगम चावल्याने ब्रेनमध्ये हिप्पोरॅम्पसचा रक्त प्रवाह वाढतो. यासोबतच ब्रेनमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढतो. यामुळे मेंदूच्या सेल्स अॅक्टिव्ह राहतात आणि यामुळे मेमरी वाढते.
* च्युइंगम तणाव कमी करण्यात मदत करते. हे मेंदूमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढवते. ब्लडमध्ये कॉर्टिसोल सारखे हार्मोन उत्पन्न होऊ देत नाही.
* खुप भूक लागलेले असते. त्यावेळी च्युइंगम खाल्ल्याने भूक शांत होते. यामुळे आपण जास्त जेवण करत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करायचे असेल तर शुगर फ्री आणि कमी कॅलरीचे च्युइंगम चावावे.
* प्रवासात मळमळ होत असेल तर च्युइंगम चावावे. यावेळी मिंटी गम चावल्याने आराम मिळेल. च्युइंगम चावताना तोंडा जास्त प्रमाणात लाळ उत्पन्न होते. यामुळे मळमळ होत नाही.
* च्युइंगम चावल्याने तोंडात जास्त प्रमाणात लाळ उत्पन्न होते. यामुळे आपले इंटेस्टाइन गुळगुळीत होते. यामुळे मल त्याग करण्यास अडचण येत नाही. बध्दकोष्ठ जास्त असल्यास डॉक्टरांना दाखवावे.
* काम करताना तुम्हाला थकवा आणि सुस्ती येत असेल तर च्युइंगम चावावे. यामुळे तुम्ही जास्त अलर्ट आणि एनर्जेटिक होऊ शकतात. हे शरीरातील रक्त आणि मेंदूमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढवते.
* अनेक लोकांना कानावर हवेचा जास्त दबाव पडल्यामुळे त्रास होतो. या काळात च्युइंगम चावल्याने हवा बाहेर निघते. यामुळे कानदुखी कमी होते.