आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ॐ अर्थात ओउम् तीन अक्षरांनी बनलेला शब्द. ॐ शब्द अ, उ आणि म अक्षरांनी मिळून बनलेला आहे. ज्यामध्ये ‘अ’ चा अर्थ आहे उत्पन्न होणे, ‘उ’ चा तात्पर्य उठणे किंवा उडणे, विकास होणे आणि ‘म’ चा अर्थ मौन होणे. ओउम् या शब्दाचा तुम्ही नियमित उच्चार केल्यास तुमच्यात सकारात्मक भावना निर्माण होते. याचबरोबर अनेक आजार तुमच्यापासून लांब राहतात.
ॐ च्या उच्चार केल्याने होणारे फायदे –
अनेकदा ॐ च्या उच्चाराने शरीरातील तणाव कमी होते. जर तुम्हाला झोप येत नसेल तर ॐचा उच्चार सुरु करा. काही वेळेतच तुम्हाला शांती वाटेल आणि चांगली झोप लागेल.
ॐ च्या उच्चाराने हृदय आणि रक्त प्रवाह संतुलित होण्यास मदत होते. तसेच उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब संबंधी समस्याही दूर होतात. ॐ च्या शक्तीमुळे केवळ मानसिक रोगचं नाही तर शरीरातील अनेक रोग ठीक करण्यास लाभदायक असते. पचनक्रिया सुरळीत चालण्यातही याचा चांगला फायदा होतो.
थायरॉइड ग्रंथीच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ओमचा उच्चार खूप लाभदायक असते. यामुळे आवाज आणि गळ्यात कंपन निर्माण होते याचा सकारात्मक प्रभाव थायरॉइड ग्रंथीवर होतो. काही विशेष प्राणायामासोबत ॐचा उच्चार केल्याने फुफ्फुसांमध्ये मजबूती येते.
ॐचा उच्चार केल्याने सगळा थकवा दूर होतो. काही वेळ डोळे झाकून ॐ च्या उच्चाराने थकवा दूर होतो.