अंगावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ फळ आवश्य खा, जाणून घ्या फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ब्लूबेरी आरोग्यासाठी लाभदायक असते. यामध्ये भरपूर प्रमाणत ऍन्टी- ऑक्सीडन्ट तत्त्व असतात. जे हायपरटेन्शन, मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या आजारांपासून मुक्त होऊ शकतो. याच्या सेवनाने कँसरलाही नियंत्रित करू शकतो. चला जाणून घेऊया ब्लूबेरीचे फायदे

ब्लूबेरीच्या सेवनाने पोटाची चरबी कमी होते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ब्लूबेरीच्या सेवनाने शरीरातील शुगर लेवल कमी होते आणि यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी ब्लूबेरी हे महत्त्वाचे काम करते. ब्लूबेरीमध्ये ऍन्थोसियानिडिनस चे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते. याच बरोबर ब्लूबेरी रक्तातील शुगरची मात्रा नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

ऍन्थोसियानिडिनस मुळे स्ट्रेस लेव्हल कमी करण्यातही खूप मदत होते. ब्लूबेरीमुळे हृदयाच्या संबंधी समस्या दूर होतात. आणि हृदयविकाराच्या  झटक्या पासून ही वाचू शकतो.

ब्लूबेरीच्या सेवनाने कॅन्सर सारखा आजरही बरा होऊ शकतो. यामध्ये एलेगीकी ॲसिड आणि टेरोस्टीलबीन पदार्थ मौजूद असल्याने जे कँसर सारखे आजार दूर करतात.