आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सफरचंद हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोगी व्यक्ती किंवा निरोगी व्यक्ती या दोघांनाही डॉक्टर सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. कारण आपण जर रोज १ सफरचंद खाल्लं तर आपण कधीच आजारी पडत नाहीत. त्यामुळे आपण आपल्या आहारात सफरचंदाचा उपयोग करणे गरजेचे आहे. जाणून घ्या सफरचंद खाल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो.
सफरचंद खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे :
१) जर तुमच्यात रक्ताची कमतरता असेल तर रोज 2-3 सफरचंद खाण्याची सवय लावा. यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.
२) सफरचंदामध्ये फ्लावनोईड असते जे महिलांना ओस्टियोपोरोसिस पासुन वाचवते. कारण फ्लावनोईड हाडांची मजबुती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे सरचंद खाल्ले की हाडे मजबूत होतात.
३) सफरचंद किडनी स्टोन तयार होण्यापासून थांबवते. कारण यामध्ये साइडर सिरका चांगल्या प्रमाणात असतो. त्यामुळे ज्या व्यक्तीला किडनी स्टोनचा त्रास आहे. त्याने आहारात सफरचंदाचा उपयोग करावा.
४) सफरचंदमध्ये उपलब्ध क्वरसिटिन शरीराच्या सेल्सला नुकसान होण्यापासुन वाचवतात. ज्यामुळे कँसरचा धोका कमी होतो.
५) सफरचंदामध्ये उपलब्ध असलेले पेक्टिन शरीरातील ग्लाक्ट्रोनिक ऍसिडची कमतरता दूर करते. यासोबतच इंसुलिनच्या वापराला कमी करते.
६) सफरचंदामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते. जे पचनात मदत करते. जर संफरचंद त्याच्या सालासोबत खाल्ले तर बध्दकोष्ठ चांगले होते.
७) लठ्ठपणा हे अनेक आरोग्य समस्यांचे कारण मानले जाते. जसे लठ्ठपणामुळे हृदय रोग, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज सारखे आजार होतात. सफरचंदात जास्त प्रमाणत फायबर असते. जे वजन कमी करण्यात मदत करते.