महिलांनी गर्भावस्थेत करावे कारल्याचे सेवन, होती अनेक फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गरोदरपणात कोणता आहार घ्यावा याबाबत महिलांमध्ये खूपच गर्भावस्थेत स्त्रिया आपल्या खाण्यापिण्याबद्दल फारच जागरूक असतात. परंतु, अशावेळी काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. कारण सल्ले देणारे अनेक असतात. त्यामुळे काय खावे काय खाऊ नये, याबाबत नेहमीच गोंधळ असतो. गरोदरपणात महिलांनी कारले खायला पाहिजे की नाही याबद्दल संभ्रम असतो. मात्र, गर्भावस्थेदरम्यान कारल्याचे सेवन आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारल्यात भरपूर फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, बीटा-केरोटिन आणि आयटड्ढी फायबर असते. यामुळे गर्भातील बाळ आणि आई दोघांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते.
कारल्यात असलेले व्हिटॅमिन सी हे अँटिऑक्सिडंट असून ते गर्भवती महिलांचे हानिकारक बॅक्टेरियापासून रक्षण करते. यामुळे गर्भवती महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती कारल्याच्या सेवनाने मजबूत होते. कारले पेरिस्टालिसिसला बूस्ट देत असल्याने बॉवेल हालचालीलाही नियंत्रित करते. यामुळे गर्भवती महिलांची पचनक्रिया व्यवस्थित होते. तसेच कारले खाल्ल्याने पचन तंत्राशी निगडित अन्य समस्यांमध्ये सुद्धा आराम मिळतो. गर्भवती महिलांना फोलेटची आवश्यकता असते. हे मिनरल्स संभावित न्यूरल ट्यूब डिफेक्टला सुरक्षित ठेवते. कारल्यात फोलेटची मात्रा जास्त असून गर्भवती महिलांमध्ये या मिनरल्सच्या रोजच्या गरजेच्या एकचतुर्थांश भाग यामध्ये आहे.
कारल्यात हे खास प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा मोठा स्रोत आहे. यात आयर्न, नियासिन, पोटॅशियम, पेंटोथेनिक अॅसिड, जिंक, पाइरोडॉक्सिन, मॅग्नेशियम आणि मँगनीज असते. म्हणून यास सुपर भाजी म्हणतात. हे भ्रूणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. कारल्यात फायबर उच्च मात्रेत असते, ज्यामुळे भूक लवकर लागत नाही. हे हाय कॅलरी फूड्स आणि जंक फूड्सच्या क्रेविंग्सला कमी करते. शिवाय, प्रेग्नन्सीदरम्यान लठ्ठ होण्यापासून बचाव करते.