आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्याकडे जास्त म्हशीचं आणि गाईचं दुध घेतल जात. पण शेळीच्या दुधाचा साधा वास जरी म्हंटल तरी तो आपल्याला नको असतो. पण हे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि लहान मुलांना जर शेळीचं दूध पाजलं तर त्यांचं आरोग्य सुदृढ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे नवजात बालकाला जर त्याच्या आईचे दूध मिळू शकले नाही. तर त्याला शेळीचे दूध पाजणे हे त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
शेळीच्या दुधाचे फायदे खालीलप्रमाणे :
१) शेळीच्या दुधात जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. आणि लहान बाळांना प्रोटीनची खूप गरज असते. त्यामुळे शेळीचे दूध हे लहान बाळांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
२) कोणाच्या जर आतड्याला सूज आलेली असेल तर त्याने शेळीचे दूध प्यावे. कारण यामुळे आतड्याची सूज कमी होते.
३) शेळीचं दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे शेळीचं दूध पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
४) बकरीचं दूध कोलेस्ट्रॉल कंट्रोल करत आणि हृदयासंबंधीत आजार दूर करतं.
५) शेळीचं दूध हे अनेक आजारांवर नियंत्रण करते.