आरोग्यनामा ऑनलाईन टीम – संडे हो या मंडे रोज खावो अंडे असं म्हंटल जात. कारण अंडे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे आपण अंड्याचा आपल्या आहारात समावेश करतो. पण आपण अंड शिजवून खातो. मात्र कच्ची अंडीही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. कच्ची अंडी खाण्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे ते जाणून घ्या.
१) अंड्यात असणारे प्रोटीन हे शरीराच्या जुन्या कोशिकांना मजबुत करण्यासाठी आणि नविन कोशिका तयार करण्यासाठी मदत करते. एका अंड्याच्या पिवळ्या भागात ६६ ग्रॅम फॉस्फरस आणि २२ एमजी कॅल्शियम असते. आपल्या शरीरामध्ये ३७ ट्रिलियन कोशिकांना चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी फॉस्फोरसची गरज असते. त्यामुळे कच्चे अंडे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
२) आपल्या शरीराला फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्सची खुप आवश्यकता असते. कच्या अंड्यातून बऱ्याच प्रमाणात जीवनसत्व मिळतात. त्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.
३) कच्च्या अंड्यात आपल्याला आवश्यक पोषकतत्त्व, व्हिटॅमिन्स मिळतात. कार्बोहायट्रेट्स, प्रोटीन आणि फॅटला ब्रेक डाउन करण्यासाठी कच्चे अंडे उपयोगी पडते. अंड्याचा कच्चा पिवळा भाग खाल्ल्याने एनिमिया हा आजार दूर होतो.
४) आपण जर रोज २ अंड्याचे सेवन केले, तर त्यातून एक सफरंचंदा एवढी अँटीऑक्सीडेंट आपल्याला मिळु शकते. तसेच कच्चे अंडे वाढत्या वयात मांसपेशींना बळकट बनवतात.