आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. मिठाचे अनेक प्रकार आहेत. आपण जेवणामध्ये पांढऱ्या मिठाचा सर्वात जास्त वापर करतो. मात्र पांढऱ्या मिठापेक्षा काळे मीठ (सैंधव मीठ) शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे. काळ्या मीठामध्ये सोडिअम, आयर्न, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असतं. काळ्या मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.
काळ्या मीठाचे फायदे –
हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण
काळ्या मीठामुळे शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासही मदत होते. तसेच हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
तणाव कमी करण्यासाठी
तणाव कमी करण्यासाठी काळ्या मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. काळे मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
स्नायू मजबूत होण्यासाठी
काळ्या मीठामध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे काळ्या मीठाच्या सेवनानं स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी
पांढरं मीठ वजन वाढवण्याचं काम करतं तर काळं मीठ वजन कमी करण्यास मदत करतं.
साखरेचे प्रमाण नियंत्रीत करण्यासाठी
काळे मीठ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवतं.
लहान मुलांच्या आरोग्यासाठी गुणकारी
हे मीठ लहान मुलांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. जेवणात काळे मीठ टाकल्याने मुलांना पोटदुखी, कफ यासारखे आजार कमी होतात.
सायनसचा त्रास कमी होतो
सायनसचा त्रास असलेल्यांनी काळ्या मीठाचे सेवन करणे गरजेचे असते.
किडनी स्टोन
किडनी स्टोनचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करुन प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो.
पित्ताचा त्रास कमी
पित्त झाल्यावर आलं लिंबू आणि सैंधव मिठाचे चाटण थोडं थोडं खाल्यास पित्त मुळे आणि इतर कारणांमुळे होणारी उलटी थांबते.