पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – आज भारतात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. त्यामुळे अनेकांनी ठिकठकाणी योगा केला काही करत आहेत. आणि अनेकजण नियमित योगा करतात. कारण त्याची निरोगी आरोग्यासाठी खूप गरज आहे. परंतु आपण योगा जरी नियमित करत असलो. तरी योगा करण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे. हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे योगा कण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे. हे आपण माहित करून घेतलं पाहिजे.
योगा कोणत्या वेळेत करावा ते खालील प्रमाणे
१) सकाळची वेळ : योगा करण्यासाठी सकाळची वेळ योग्य असते. परंतु नाष्टा करण्याच्या अगोदर योगा करणे गरजेचे आहे. कारण योगा करताना आपलं पोट रिकामं असलं पाहिजे. सकाळी योगा केला तर आपण दिवसभर ताजेतवाने राहतो. त्यामुळे आपण सकाळी योगा करणे गरजेचे आहे.
२) जेवण केल्यांनतर : तुम्हाला जर सकाळी योगा करायला वेळ नसेल तर तुम्ही जेवण केल्यांनतर ३ तासांनी योगा करू शकता. कारण जेवणानंतर ३ तासांनी आपल्या पोटातील अन्न बऱ्यापैकी पचन झालेलं असत आणि आपलं पोटही बऱ्यापैकी रिकामं होत त्यामुळे आपण जेवणानंतर ३ तासांनी योगा करावा. ते आरोग्यासाठी चांगलं राहील.
३) तणावमुक्त आणि शांत मन असल्यावर : योगा करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असत ते म्हणजे योगा करण्याच्या अगोदर आपण कोणत्याही चिंतेत असता काम नये. आणि महत्वाचं म्हणजे योगा करताना आपलं मन शांत असं गरजेचं आहे. तरच आपण चांगल्या पद्धतीने योगा करू शकतो.
४) ज्या वेळेत रोज योगा करता : आपण रोज ज्या वेळेत योगा करतो. त्याच वेळेत रोज योगा करायला हवा. आपण जर रोज वेगळ्या वेळेत योगा करत असू तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही योगासाठी तुमची एकच वेळ फिक्स करा.
५) नियमित योगा करा : आपल्या शरीरात योगामुळे अनेक वेगवेगळे बदल होत असतात. ते बदल अनुभवण्यसाठी आपल्याला रोज योगा करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या शरीरात काय बदल होतात. ते आपल्याला कळेल.
६) जास्त वेळ योगा करू नये : आपण योगा थोडा वेळ करायला हवा. कारण योगा केल्याने आपण थकल्यासारखे होतो. त्यामुळे जर जास्त वेळ योगा केला तर आपण दुसरं कोणतं काम करू शकणार नाही. त्यामुळे योगा थोडा वेळच करा.