आरोग्यनामा ऑनलाइन टीम : गुलाबाचे फुल हे अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी आणि सुंदरता वाढवण्यासाठी उपयोगी आहे. प्राचीन काळापासून गुलाबाचा वापर विविध कारणांसाठी केला जात आहे. गुलाबाच्या फुलामध्ये विविध आजारांवर उपचार करण्याची क्षमता आहे. गुलाब हा आकर्षकपणा, सुगंध आणि औषधी गुणांमुळे प्रसिद्ध आहे. गुलाबाचे फुल आणि पानांचे औषधी उपाय आणि फायदे आपण जाणून घेवूयात.
मुळव्याध
गुलाबाची पाने मुळव्याधीच्या समस्येमध्ये लाभदायक आहेत. यातील फायबर आणि पाणी यामुळे हा फायदा होतो. पचनक्रिया योग्य ठेवण्यासोबातच शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर पडतात. मुळव्याधीमध्ये होणारा रक्तस्त्राव आणि वेदनेपासून आराम मिळतो. थोड्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पानांना बारीक करून पेस्ट तयार करावी. दररोज सकाळी रिकाम्यापोटी याचे सेवन करावे. नियमित तीन दिवस हा प्रयोग केल्यास फरक दिसून येतो.
काळे डाग
गुलाबाच्या पानांमुळे पिंपल्स दूर होतात. काळे डाग दूर होऊन चेहरा उजळ दिसतो. गुलाबाची पाने ग्लिसरीन टाकून बारीक करून घ्यावीत. हे मिश्रण ओठांना लावल्यास ओठ गुलाबी आणि कोमल होतात.
उष्णता
अतिउष्णतेमुळे शरीरावर फोड येतात. अशावेळी गुलकंद खाल्ल्यास फरक पडतो. रोगप्रतिकारक क्षमता वाढते.