आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चुकीच्या पद्धतीने झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. अनेकजण हा प्रयत्न करताना क्रॅश डाएटचा पर्याय निवडतात. परंतु, यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. क्रॅश डाएटचे शरीरावर कोणते गंभीर परिणाम होतात, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत धोके
१. क्रॅश डाएटमुळे हृद्याचे आरोग्य धोक्यात येते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता निर्माण होते.
२. शरीरात मुबलक आयर्न नसल्यास अॅनिमियाचा त्रास बळावू शकतो.
३. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे ऑस्टोपोरायसिसचा त्रास वाढतो.
४. आवश्यक कॅलरीजपेक्षा कमी डाएट घेतल्याने उपासमार होऊन शरीरात एनर्जी साचवून ठेवली जाते. त्याचा परिणाम मेटॅबॉलिझमवरही होतो.
५. अचानक अन्न घेण्याचे प्रमाण कमी झाल्यास, शरीराचे चक्र बिघडते.
६. क्रॅश डाएटमुळे अनेकदा वॉटर वेट कमी होते. यामुळे फॅट कमी होईलच असे नाही. ७ शरीराला आवश्यक पाणी न मिळाल्याने अनेक समस्या वाढू शकतात. डोकेदुखी, थकवा, बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो.
८. डीहायड्रेशनमुळे किडनीच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात.
९. शरीरात सोडीयमची पातळी कमी झाल्याने थकवा जाणवून गरगरल्यासारखे होते.
१०. इलेक्ट्रोलेट बॅलन्सची पातळी कमी जास्त झाल्याने कार्डियोव्हसक्युलर फंशनवर परिणाम होतो.