https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_0270b7b2732771eacf72833096523694.js
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

अर्धशिशी म्हणजे काय ? जाणून घ्या, करा हे उपाय

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 22, 2019
in माझं आराेग्य
0
headche
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोकेदुखीचे कारण अनेकांना माहितच नसते. डोकेदुखी होत असल्यास पेनकिलर घेऊन उपाय केला जातो. हे खूपच गंभीर ठरू शकते. अनेकांना आपल्याला अर्धशिशीचा त्रास असल्याचे माहितच नसते. अशा डोकेदुखीला सामान्य डोकेदुखी समजून काही व्यक्ती वेदनाशामक गोळ्यांचे सेवन करतात. डोकेदुखीने विक्राळ रूप धारण करू नये, यासाठी डोकेदुखीची कारणे आणि उपाय याबाबत माहिती असणे खूपच गरजे आहे. यासंदर्भात योग्य माहिती नसेल तर काही आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो.अनेकांना अधिक तणाव, अस्वस्थ असताना वा चुकीच्या बॉडी पॉश्चरमुळे मानेच्या स्नायूंवर पडणाऱ्या अनावश्यक दबावाने डोकेदुखी होते. तणावामुळेच डोकेदुखी अधिक होते. तसेच ७५ टक्के अर्धशिशीने पीडित व्यक्ती मानेच्या वेदनेनेही त्रस्त असतात. याव्यतिरिक्तही डोकेदुखीची कारणे असू शकतात.

अर्धशिशी (मायग्रेन) ही समस्या केवळ ५० टक्के लोकांच्याच लक्षात येते. संपूर्ण डोके अर्धशिशीच्या विळख्यात येत नाही, तोपर्यंत अर्धशिशी होऊच शकत नाही, असे काहींना वाटते. १५-२० टक्के लोकच अशा प्रकारच्या अर्धशिशीने पीडित असतात. अशा डोकदुखीने पीडितांना अनेकदा कामातून सुटी घ्यावी लागते. यामुळे कामावर खूप परिणाम होतो. दररोज होणाऱ्या डोकेदुखीमागे अनेक कारणे असू शकतात. बऱ्याच प्रकरणांत पीडिताचा अर्धशिशीचा पूर्वेतिहास असणे आणि डोकेदुखीवर गरजेपेक्षा अधिक औषधींचे सेवन करण्याची सवयच कारणीभूत असते.अर्धशिशी ही १९ व्या क्रमांकावरील आरोग्य समस्या असून तिच्यामुळे पीडित व्यक्तीच्या जीवनावर अनेक वर्षे परिणाम होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

ज्या लोकांना अस्थिविवर संसर्गासोबतच डोकेदुखीही असते, त्यांना ताप, पडसे व अस्थिविवरात तीव्र वेदना होण्याची शक्यता असते. डोकेदुखी एखाद्या आरोग्य समस्येचा संकेत असतेच. परंतु, तीव्र डोकेदुखी सायनसलाही कारणीभूत आहे. जवळपास ९० टक्के लोकांना जेव्हा सायनस डोकेदुखीने पीडित असल्याचा संशय येतो, तेव्हा ते प्रत्यक्षात अर्धशिशीनेही पीडित असतात. चार टक्के लोक दररोज डोकेदुखीने त्रस्त असतात.क्लस्टर डोकेदुखीत पीडिताच्या डोळ्यांच्या आसपास व डोक्याच्या वरच्या भागात तीव्र वेदना होतात, ज्याचा कालावधी सुमारे २० मिनिटे ते दोन तास असू शकतो. डोळ्यांतून पाणी येणे, नाक जाम झाल्याने श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे इतर प्रकारच्या डोकेदुखीतही आढळतात. क्लस्टर डोकेदुखी अर्धशिशीपेक्षा वेगळी असल्याने उपचारही वेगळेच केले जातात.

अर्धशिशीवर हे उपाय करा

* डॉक्टरांनी दिलेल्या औषधींचे सेवन
* अंधाऱ्या खोलीत आराम करणे
* कॅफिनचे मर्यादित सेवन
* डोकेदुखीवर ८ सुलभ उपचार
* आराम करणे
* आइस पॅक लावणे
* नियमित व्यायाम करणे
* डायटरी सप्लिमेंट्स
* पेय पदार्थ व पाण्याचे भरपूर सेवन
* थोडीशी मालिश, अ‍ॅक्युपंक्चर
* कोमट पाण्याने स्नान करणे
* दिवसभर चार-पाच वेळा अल्पोपाहार घ्या

Tags: arogyanamacaffindoctorHeadachehealthice packpenkillerSemi-physicianअर्धशिशीआइस पॅकआरोग्यआरोग्यनामाकॅफिनडॉक्टरडोकेदुखीपेनकिलर
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021

https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_12a509b063a96161625ad1369bb83aaa.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_b605ce07b30eb613685999f5e490792a.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_ed3b4417df0895e4cf8465d32b69adc6.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_64a0aa4031f195121a832584e7c5318c.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_71ed5d351d462619d0b359f73f22bc2c.js