आरोग्यानामा ऑनलाईन टीम : प्राण्यांमध्ये दोन भिन्न लिंगांमधील आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे सेक्स. मात्र, काही जण निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. दोन जिवांना परस्पर संमतीने शारीरिक संबध ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे. काही तज्ज्ञ सांगतात, सेक्स न केल्यास नपुंसकत्व येण्याची किंवा कॅन्सरग्रस्त होण्याची वेळ येऊ शकते. शास्त्रज्ञांच्या मते खूप काळ सेक्स न केल्यास गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.
द जर्नल बायोलॉजिकल सायकोलाजीच्या एका अहवालानुसार, ज्या व्यक्ती सेक्स करत नाहीत त्या तणावग्रस्त परिस्थिती राहतात. त्यांना तणावाचा सामना करता येत नाही. कारण सेक्स करतेवेळेस चांगले हार्मोन निर्मिती होत असते. या हार्मोनमुळे तणावावर मात करण्यास मोठी मदत होते. सेक्स न केल्याचा आणखी गंभीर परिणाम म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. एका संशोधनानुसार जे लोक नियमित सेक्स करतात (आठवड्यातून एकदा किंवा दोनदा) त्यांच्यात सेक्स न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात रोगप्रतिकारक क्षमता असते.
अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, जे पुरुष काही दिवस सेक्स करत नाहीत त्यांच्यात आठवड्यातून एकदा सेक्स करणाऱ्यांच्या तुलनेत प्रणयासाठी तयार होण्यास अडथळा येतो. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही खूप काळ सेक्स न केल्यास तणावग्रस्त वाटत असते. एका अभ्यासानुसार, वीर्यातील मेलाटोनिन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन यासारख्या हार्मोन्समुळे स्त्रियांचा मूड सुधारण्यास मदत होते.सर्वात गंभीर म्हणजे सेक्स न केल्याने शरीरावर काही वेगळे परिणाम होऊ शकतात. ते व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असतात. एका संशोधनानुसार, जे पुरुष नियमित सेक्स करतात त्यांना सेक्स न करणाऱ्यांच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी असतो.