आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीराच्या प्रत्येक अवयवाची आपण काळजी करत असतो. या अवयवांच्या स्वास्थासाठी आपण विविध उपाय तर कधी औषधांची मदत घेत असतो. चेहऱ्यावर नेहमी हास्य असणे आपल्या सुंदरतेत भर पाडते. अशातच आपले दातही तितकेच स्वच्छ दिसणे आणि मजबूत असणेही गरजेचे असते. दातांच्या मजबुतीसाठी काही घरगुती उपाय आणि काही आवश्यक खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊ
आवळा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी दातांसाठी आणि हिरड्यांसाठी उपयुक्त असते . दात आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी आवळ्याचे सेवन करावे . याव्यतिरिक्त आवळ्याच्या रसाचा नियमित सेवन ही फायदेमंद असतो.
मीठ
मीठाच्या वापराने ही आपले दात मजबूत होतात. दातांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी मिठाचा वापर करावा. मोहरीच्या तेलात मीठ मिसळून दातांची मालिश करावी. यामुळे हिरड्या मजबूत होतात आणि दात ही मजबूत होतात.
पुदिना तेल
पुदिना तेल दातांसाठी फायदेमंद असतो. यामुळे हिरड्यात दुखणे आणि सूज येणे अशा त्रासांना कमी करते. त्याचबरोबर जर दात हलत असेल तर त्यावर पुदिना तेल हे एक उत्तम उपाय आहे.
चिकन सूप
जर तुम्हाला दातांबद्दल काही समस्या असल्यास चिकन सूप पिणे फायदेमंद होतात. दातात त्रास होत असेल तर गरम चिकन सूप पिल्याने त्रास कमी होतो.
दही
शरीरात खराब बॅक्टेरियाचे प्रमाण वाढल्यास दात दुखणे आणि दातात सूज येणे अशी समस्या निर्माण होते. अशा वेळी दहीचा सेवन करावा. दही मध्ये प्रोबायोटिक्स निर्माण करण्याची जास्त क्षमता असते. प्रोबायोटिक्स हे शरीरात चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढीचे काम करते. यामुळे दातांची समस्या कमी होते.