आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अंधारात स्मार्ट फोन वापरणे आरोग्याच्या दृष्टीने खुप घातक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. रात्रीच्या अंधारात फक्त ३० मिनिटे स्मार्टफोनच्या स्क्रीनवर काम केले तरी डोळे कोरडे पडतात. डोळे कोरडे झाल्यामुळे रेटिनावर वाईट परिणाम होतो. दिर्घकाळ ही सवय राहिल्याने दृष्टी कमी होऊ शकते. योग्य काळजी घेतली नाही तर डोळे आणि शरीराच्या इतर भागांवरही वाईट प्रभाव पडू शकतो, असे अमेरिकन मस्कुलर डिजनरेशन फाउंडेशन, हार्वर्ड यूनिव्हर्सिटी आणि यूनिव्हर्सिटी ऑफ वरसेस्टर, इंग्लंडच्या संशोधनात हे आढळून आले आहे.
हे नुकसान होते-
१) मेंदुवर वाईट परिणाम होतो.
२) दिवसभर थकवा जाणवतो.
३) ग्लूकोमाची समस्या होऊ शकते.
४) फोक सोंग मसल्सवर परिणाम होतो.
५) डोळे लाल होतात.
६) डार्क सर्कलची समस्या होऊ शकते.
७) दृष्टी कमी होते.
८) झोप कमी होते.
९) तणाव वाढू शकतो.