आरोग्यानामा ऑनलाइन टीम – जेवणाची चव वाढविणारा लसूण जवळपास सर्वच स्वयंपाकघरात आवर्जून आढळतो. विविध आजारांवर तो गुणकारी असल्याने उपचारासाठी लसणाचा औषध म्हणून वापर केला जातो. परंतु, लाभदायक असलेला हा लसूण जास्त प्रमाणात सेवन केल्यास नुकसानही होऊ शकते. याच्या अतिसेवनाने कोणते नुकसान होते, ते जाणून घेवूयात.
हृदयाला धोका
लसूण जास्त खाल्लाने रक्तातील कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होतो. हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, असे संशोधकांना आढळून आले आहे.
पचनाच्या समस्या
कच्चा लसूण खाल्ल्याने पोटात दुखणे, भूक कमी लागणे, गॅस, उलटी होणे, पोटात-छातीत जळजळ होणे, डायरिया असा त्रास होऊ शकतो.
त्वचेचे नुकसान
चेहऱ्यावर लसणाची पेस्ट लावणे नुकसानकारक आहे.
सर्जरीपूर्वी खाल्ल्यास धोका
सर्जरीच्या कमीत कमी दोन आठवड्यांपूर्वी लसणाचे सेवन करु नये. कारण यामुळे सर्जरीत अडचणी येण्याची शक्यता असते. लसणामुळे रक्तसंचार वेगाने होतो.
ब्लीडिंग डिसऑर्डर
ब्लीडिंगची समस्या वाढू शकते. ब्लीडिंग डिसऑर्डरच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी लसणाचे सेवन योग्य प्रमाणात करावे.