रक्तस्त्राव होणे
केसप्रत्यारोपणाची प्रक्रिया केल्यानंतर रक्तस्त्राव होणे ही सर्वसाधारण बाब आहे. हा स्त्राव प्रेशर देऊन बंदही करता येतो पण जर रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाला तर, ऑपरेशन करण्याची वेळही येऊ शकते.
इन्फेक्शन होणे
केसप्रत्यारोपणानंतर बॅक्टेरियाशी संपर्क होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
खाज येणे
प्रत्यारोपण केलेल्या ठिकाणी खाज येणे साहजिकच आहे पण त्वचेचे पापुद्रे निघाल्यामुळे खाजेचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे ते घातक ठरू शकते.
डाग पडणे
ज्यांची त्वचा संवेदनशील असते त्यांनाच सहसा हा त्रास होत असतो. काहीवेळा ज्यांनी स्ट्रीप ट्रान्सप्लांन्टेशन केलंय त्यांच्यासाठी हे धोकेदायक असू शकत. यामुळे त्वचेवर काळे डाग पडणे किंवा लाल डागही पडतात. म्हणून केसप्रत्यारोपणाचा विचार करत असाल तर त्याचे धोके काय असू शकतात हे पण जाणलेच पाहिजे.