* एंड्रोजन हार्मोनचे अधिक प्रमाण
* एड्रोनल डिसऑर्डर
हे उपाय करा
* डाळीच्या पिठामध्ये दही मिसळून पेस्ट तयार करून ही पेस्ट नको असलेल्या केसांवर लावा. थोडावेळ चेहरा स्क्रब करून स्वच्छ धुवून घ्या. दररोज हा उपाय केल्याने अनावश्यक केस निघून जातील.
* हळद आणि उडीद डाळ पावडर पाण्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करून घ्या. या उपायाने चेहरा तेलकट होणार नाही आणि अनावश्यक केसही कमी होतील.
* साखर आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेवून या मिश्रणाने नको असलेल्या केसांवर मसाज करा. पंधरा मिनिट हे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमितपणे केल्यास नको असलेले केस कमी होतात.
* अर्धा चमचा बेसन, अर्धा चमचा दुध, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा ताजी साय एकत्रित लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून २५ मिनिटांपर्यंत चेहरा तसाच ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर हाताने चेहरा स्वच्छ करून नंतर पाण्याने धुवून घ्या.
* कच्च्या बटाट्याचा २ चमचे रस, रात्रभर भिजवून ठेवून बारीक केलेली तुरीची डाळ, ४ चमचे लिंबाचा रस आणि १ चमचा मध या सर्व गोष्टी एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट लावून ठेवा. पेस्ट वाळल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.