हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पूर्वी पार्लरमध्ये हेअर ड्रायर वापरले जायचे, आता पर्सनल मेकअप किटमध्येच त्याचा समावेश झाला आहे. केस स्ट्रेटनिंग करण्यासाठी किंवा केस कुरुळे करण्यासाठी वापरला जाणारा हेअर ड्रायर आता केस सुकवन्यापासून ते हेअर स्टाईल करण्यापर्यंतआता सर्रास वापरला जाऊ लागला आहे. हेअर ड्रायर क्वचित वापरणे ठिक, पण या ड्रायरचा नियमित वापर केल्यास त्याचा केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन केसांचे नुकसान होऊ शकतं.
हेअर ड्रायरच्या अतिवापरामुळे केसांचे होणारे नुकसान –
केस वारंवार धुण्यापेक्षा हेअर ड्रायरच्या मदतीने केस सुकवल्यास केसांचे दहापटीने अधिक नुकसान होते.
हेअर ड्रायर तसेच आयर्निंग सारख्या इलेकट्रोनिक उपकरणांमधून येणारी गरम हवा केसांना हानीकारक असते.
केसांवरती एक विशिष्ट प्रकारचं आवरण असतं. ज्यातून केसांना मऊपणा आणि ओलावा मिळतो. हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे हा ओलावा कमी कमी होत जातो. ज्यामुळे केस तुटतात किंवा केसांवर ताण येण्याची शक्यता असते. तसेच केस कोरडे पडतात आणि केसांना फाटे फुटतात.
हेअर ड्रायरच्या तापमानामुळे केसांमधील पाण्याचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे केसाला हानी पोहोचू शकते.
केसांचा जर ड्राय असतील, तर ओले केस ड्रायरच्या गरम हवेने अधिक राठ होतात. त्यामुळे डोक्याची त्वचा कोरडी होऊन कोंडा होतो. केस खराब होतात.
हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा हेअर आयर्निंग या उपकरणांचा वापर केल्याने केसांचं कधीही भरून न निघणारं नुकसान होतं. त्यामुळे हेअर ड्रायरचा वापर करण्याऐवजी केसांना नैसर्गिकरित्या सुकवणेच योग्य आहे.