केस पांढरे असतील तर आहारात करा ‘हा’ बदल
आरोग्यनामा ऑनलाइन – केस पांढरे होणे ही एक सामान्य प्रक्रिया असली तरी अलिकडे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या खूपच वाढली आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या या समस्येमागे विविध कारणे आहेत. खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी हे यापैकी मुख्य कारण आहे. तसेच लाइफस्टाइल, धुम्रपान किंवा प्रदूषण यामुळेही केस पांढरे होतात. यासाठी योग्य, संतुलित आहार घेतला पाहिजे. ही समस्या दूर करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत आपण सविस्तर माहिती घेवूयात.
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कृत्रिम रंग आणि गोडवा असतो. यामुळे शरीरात चरबी साठून लठ्ठपणा येऊ शकतो. शुगरच्या अतिप्रमाणामुळे तोंडाच्या वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. तसेच केसही पांढरे होतात. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. एका दिवसात २३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणे चांगले नाही. जास्त मीठ खाल्ल्याने किडनी, हाय ब्लड प्रेशर आणि केसगळती व केस पांढरे होणे या समस्या होतात.
जास्त गोड पदार्थ आणि कृत्रिम रंग असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. याचे सेवन केल्याने मायग्रेन, अॅलर्जी आणि केस पांढरे होणे या समस्या होतात. तसेच साखरेचे अधिक सेवन केल्याने आरोग्यसंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. याने केसही पांढरे होतात. त्यामुळे मिठाई, जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स टाळावे. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन ई चे प्रमाण कमी होते. हे व्हिटॅमिन केसांच्या विकासासाठी गरजेचे आहे.