‘या’ १० सवयींमुळे पुरूषाला येऊ शकते नपुंसकता, अशी घ्या काळजी

Napunsakta Samasya

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वैवाहिक जीवन आनंदायी आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी स्त्री-पुरूष दोघांनी काळजी घेतली पाहिजे. काही चूकीच्या सवयींमुळे या आनंदावर विरजन पडू शकते. नपुसंकतेमुळे वैवाहिक जीवन अडचणीत येण्याची शक्यता असते. नपुसंकता येण्याची विविध कारणे आहेत. ज्या १० सवयींमुळे पुरूषाला नपुसंकता येऊ शकते, त्या सवयी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यामुळे वेळीच सावध होऊन अशा सवयींपासून दूर राहता येईल.

मधुमेहामुळे सुद्धा अनेक पुरुषांमध्ये नपुंसकता येऊ शकते. शरीरात साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्यास किंवा कमी होत असल्यास हा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी गोड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळले पाहिजे. मुधमेह कायम नियंत्रणात ठेवल्यास हा त्रास होणार नाही. तसेच जास्त प्रमाणात कॉफी पिणे पुरुषांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. चहा, कॉफीमुळे शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढल्यास कमजोरी येऊ शकते. तसेच जास्त प्रमाणात दारू पिल्याने देखील व्यक्ती नपुंसक होऊ शकतो.

लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाब असे आजार होतात. शिवाय लठ्ठपणामुळे पुरुषांमध्ये नपुंसकता सुद्धा निर्माण होऊ शकते. यासाठी नियमिती व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. २०२५ पर्यंत नपुंसक लोकांची सर्वाधिक संख्या भारतात असू शकते. यामागचे मोठे कारण म्हणजे उच्च रक्तदाबाच्या रूग्णांची वाढती संख्या आहे. तसेच अनियमित दिनचर्या आणि मधुमेह यास कारणीभूत आहे, असे तज्ज्ञ सांगतात. सतत जागरण, कमी झोप यामुळे हार्मोन्सचे नियंत्रण बिघडून सुद्धा नपुसंकता येऊ शकते.

तसेच जास्त मानसिक तणावामुळे पौरुष शक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे नपुंसकता येऊ शकते. अयोग्य आहारामुळे सुद्धा नपुंसकता निर्माण होते. खूप तिखट, मसालेदार, तळलेले अन्न सेवन केल्यास शरीरात पित्ताची मात्रा वाढून विर्याचा नाश होतो. एका संशोधनानुसार जास्त प्रमाणात सायकल चालवणे पुरुषांच्या तब्येतीसाठी धोकादायक असून जे पुरुष जास्त सायकलिंग करतात त्यांच्यामध्ये नपुंसकता निर्माण होण्याचा धोका असतो.

तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे
‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे
पावसाळ्यात घ्या अशी काळजी, अरोग्य राहील चांगले
कडूलिंबाच्या पानांचा हा फेसपॅक तुमचे सौंदय आणखी वाढवेल
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा
‘हार्ट अ‍ॅटॅक’ पासून दूर राहण्यासाठी आहारातील ‘हे’ पदार्थ कटाक्षाने टाळा
पावसाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून ‘अशी’ घ्या पायाची काळजी
काय सांगताय ! मेहंदी केवळ ‘सौंदर्यच’ नाही तर ‘आरोग्यही’ खुलवते
मेंदूलाही असते व्यायामाची गरज, मानसिक उर्जेसाठी आवश्यक
‘आयंगर योगा’ करा आणि तणावमुक्त व्हा, आणखीही आहेत फायदे