आरोग्यनामा ऑनलाइन टीम : योगशास्त्रात ज्ञानमुद्रेस खूप महत्व आहे. ज्ञानमुद्रेच्या साहाय्याने सुप्त शक्तीही काही क्षणात जागृत करता येऊ शकते. हातातील नसाचा संबंध सरळ मेंदूशी असतो. डाव्या हाताचा संबंध उजव्या मेंदूशी तर उजव्या हाताचा संबंध डाव्या मेंदूशी असतो. यामुळे ज्ञानमुद्रेद्वारे मानसिक आजारांपासून मुक्ती मिळते. विशेष म्हणजे सिगारेट, विडी, तंबाखू आणि दारू सारखी जडलेली व्यसन सुटतात.
ज्ञानमुद्रा करण्यासाठी अंगठा आणि त्याच्या शेजारचे बोट एकमेकांना स्पर्श करेल,अशा अवस्थेत ठेवून इतर तीन बोटांना सरळ ठेवावे. सिद्धासन, उभे राहून किंवा झोपेतही जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे या मुद्राचे प्रयोग करता येऊ शकतात. ज्ञानमुद्रेपासून विविध लाभ होतात. नियमित हा योग केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. हाताच्या अंगठ्याच्या दोन्ही बाजुंच्या ग्रंथी सक्रिय होतात. ज्ञानमुद्रा एकाग्रता वाढविते. नियमित ज्ञानमुद्रा केल्यास निद्रानाश, हिस्टेरिया, संताप आणि निराशा दूर होते.