आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भाजलेले मूठभर हरभरे आणि गूळ खाणे सर्वांसाठी लाभदायक असले तरी महिलांनी हे रोज खाल्ले तर त्यांचा अनेक समस्यांपासून बचाव होऊ शकतो. कोलेस्टेरॉल कमी झाल्याने हृदयाच्या तक्रारींपासून महिलांचा बचाव होतो. यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो. मूठभर हरभरे आणि गूळाचे कोण-कोणते फायदे आहेत, याविषयी जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे –
१) यात फायटोअॅस्ट्रोजन्स असल्याने गर्भधारणेस मदत होते.
२) यातील झिंकमुळे रंग उजळतो. केस काळे आणि दाट होतात.
३) चयापचय वाढते. वजन नियंत्रित राहते.
४) यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. सांधेदुखी दूर होते.
५) शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. युरिन इन्फेक्शनपासून बचाव होतो.
६) यातील आयर्नमुळे पीरियड्सच्या काळात होणारी रक्ताची कमतरता दूर होते.
७) यातील प्रोटीन, कार्बोहायड्रेट्समुळे कमजोरी दूर होते. उर्जा मिळते.