वजन कमी करणाऱ्या ‘ग्रीन टी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार ; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नेहमीचा चहा टाळून अनेकांनी त्यांच्या दिनक्रमात ग्रीन टीचा समावेश केला आहे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. या कारणामुळेच तो अधिक लोकप्रिय झाला आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का ग्रीन टी आरोग्यासाठी घातक सुद्धा आहे. दोन कप किंवा त्यापेक्षा अधिक कप ग्रीन टी घेणे शरीरासाठी नुकसानकारक ठरतो. . जाणून घ्या अधिक प्रमाणात ग्रीन टी घेतल्याने शरीराचे होणारे नुकसान –
पोटाच्या समस्या, निद्रानाश, मधूमेह, छातीत जळजळणे
ग्रीन टीमध्ये कॅफिन हा घटक असतो. जर तुम्ही अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केले तर पोटाच्या समस्या , निद्रानाश , डायरिया , मधूमेह , छातीत जळजळणे यांसारखे आजार होऊ शकतात.
भूक न लागणे
अधिक प्रमाणात ग्रीन टी पिल्याने भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही कमजोर होऊ शकता.
हाडे कमकुवत होणे
ग्रीन टी शरीरातील कॅलशियमचे घटक कमी करतात. त्यामुळे हाडे कमकुवत होतात.
किडनी स्टोन
ग्रीन टी मध्ये ऑक्झेलिक अॅसिड असते. तसेच कॅल्शिअम , युरिक अॅसिड, अमिनो अॅसिड आणि फॉस्फेट हे घटक आढळतात. जे ऑक्झेलिक अॅसिडसोबत मिसळल्याने किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरतात.
गर्भपात
दिवसांतून २ कपापेक्षा अधिक ग्रीन टी प्यायल्यास गर्भपात होण्याची भीती असते.
लोहाची कमी
ग्रीन टीमुळे आपल्या शरीरामध्ये आहारामधील लोह शोषले जाऊ शकत नाही. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता जाणवते. ग्रीन टी मध्ये आढळणाऱ्या टॅनिन मुळे लोहाचे शरीरात शोषण होण्यास अवरोध निर्माण होतो. त्यामुळे अॅनिमिया होण्याची शक्यता वाढते.
टेस्टोस्टेरॉनची कमतरता
ग्रीन टीच्या अधिक सेवनाने शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होतो.
Comments are closed.