• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

चेहरा आणि केसांच्या सौंदर्यासाठी संजीवनी ठरतो ‘ग्रीन टी’ ! जाणून घ्या कसं

by Sajada
January 3, 2021
in फिटनेस गुरु, सौंदर्य
0
Green tea

Green tea

84
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- अनेकांनी चहा(Green tea) आणि कॉफीसाठी आरोग्यदायी पर्याय म्हणून ग्रीन टीचा(Green tea) पर्याय स्विकारला आहे. ग्रीन टी जेवणानंतर जर घेतला तर आपण खाल्लेलं अन्न पचन होण्यास चांगली मदत होते. ग्रीन टी हा पिण्यासोबतच सौंदर्यवर्धक उपचारांसाठी देखील फायदेशीर आहे. नितळ त्वचा आणि निरोगी केसांसाठीचा सर्वात नैसर्गिक आणि सुरक्षित मार्ग म्हणून ग्रीन टीकडं पाहिलं जातं. यासाठी काही ट्रीक्स आपण जाणून घेणार आहोत. इतकंच नाही तर ग्रीन टी चेहऱ्यासाठी कसा फायदेशीर आहे याचीही माहिती आपण घेणार आहोत.

घरच्या घरीच करा ग्रीन टी ट्रीटमेंट

आपण घरच्या घरीच ग्रीन टी ट्रीटमेंट करू शकतो. जेव्हा तुम्ही शॅम्पूनं केस धुता तेव्हा कंडिशनिंग म्हणून तुम्ही ग्रीन टीचं पाणी केसांना लावू शकता. केसांच्या फॉलिकल्ससाठी हे पाणी नवसंजीवनी ठरतं. यामुळं केसांना पोषण मिळतं आणि वाढीसाठी चालना देखील मिळते. याचा केसांना खूप फायदा होतो.

चमकदार केसांसाठी असा करा ग्रीन टीचा वापर

सेलिब्रिटींसारखे चमकदार आणि मऊसुत केस हवे असतील तर ग्रीन टीच्या पानांमध्ये एक अंड फोडावं आणि दही घालून ते चांगलं एकजीव करावं. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावावं आणि ते अर्धा तास लावून ठेवावं. नतंर कोमट पाण्यानं केस धुवावेत.

चेहऱ्यासाठी ग्रीन टी फायदेशीर

जर तुम्ही मुरुमांच्या डागानं वैतागला असाल तर एक घरगुती उपाय करून बघा. ग्रीन टीच्या काही टी बॅग्ज गरम पाण्यात घाला. पाणी गाळून थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर प्रत्येक वेळी चेहरा धुण्यासाठी साध्या पाण्याऐवजी त्वचेला हितकारक असणारं हे द्रावण वापरा. ग्रीन टीनं चेहरा धुतल्यानंतर चेहरा पुसू नका. हे द्रव चेहऱ्यात हळू हळू मुरू द्या. हा क्रम जर सातत्यानं पाळला तर चेहऱ्यावरचे डाग हळूहळू नाहीसे होती आणि मुरूमांनाही प्रतिबंध होईल. त्याचप्रमाणे अचानक मुरूम येणंही बंद होईल. याच्याच जोडीला नंतर तुम्ही मॉईश्चराईजर देखील लावू शकता.

 

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: beautyfaceGreen teahairकेसग्रीन टीचेहरासौंदर्य
winter
सौंदर्य

हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते ? जाणून घ्या

December 28, 2020
sour
Food

आंबट-थंड पदार्थांचं सेवन केल्यानं सांधेदुखीचा त्रास होतो का ? , जाणून घ्या

October 19, 2020
मेथीदाण्याचे मॅजिक…नियमित खाल्ल्याने होतील ‘हे’ खास १० फायदे
माझं आराेग्य

मेथीदाण्याचे मॅजिक…नियमित खाल्ल्याने होतील ‘हे’ खास १० फायदे

August 6, 2019
Cancer
माझं आराेग्य

कँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया

August 24, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

14 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

1 day ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

1 day ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.