पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – सध्या सगळीकडे विषाणू जन्य आजाराचे प्रमाण वाढते आहे. आणि हवेत झालेला बदल लहान मुलांना सहन होत नाही. त्यामुळे त्यांना लगेच ताप, सर्दी, खोकला हे आजार होतात. मग तुम्ही तो सामान्य ताप आहे. असं समजून त्यांना तापाचं
औषध देता. परंतु, लहान मुलांना आलेला ताप हा अनेक प्रकारचा असू शकतो. जास्त ताप आला तर मुलांना गोवर ही होऊ शकतो. त्यामुळे मुलांना आलेला ताप हा साधारण ताप समजू नका. डॉक्टरांना दाखवून त्या तापाचे लवकर निदान करा.
गोवरचे लक्षणे खालीलप्रमाणे
ज्यांच्या शरीरात ‘अ’ जीवनसत्व कमी असते. त्यांना गोवर होतो. गोवर झाल्यावर २-३ दिवस खूप ताप येतो. सर्दी होते, खोकलाही येतो. आणि २-३ दिवसानंतर अंगावर लाल पुरळ दिसायला लागते. डोळे लाल होतात. तोंडाची चव जाते. गोवर झाल्यावर जास्त ताप येतो. जास्त ताप आल्यावर झटके येण्याची शकता असते. त्यामुळे मेंदूच्या काही भागाला सूज येते. याचा मुलांना खूप मोठा धोका असतो.
गोवर या आजरावर उपाय खालीलप्रमाणे
गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अॅस्पिरिन देऊ नये. यामुळे एक दुर्धर आणि जीवघेणा रेय सिंड्रोम होण्याची शक्यता असते. वाफाऱ्यामुळे घसा मोकळा होतो. रुग्णास भरपूर द्रव पदार्थ पिण्यास द्यावेत. तापामुळे शुष्कता येऊ नये म्हणून ही खबरदारी घ्यावी. गोवर झालेल्या काहीं लहान मुलाना एन्सिफलायटिस झाल्यास अ जीवनसत्त्वाचा मोठा डोस दिल्याचा फायदा झाल्याचे दिसले.