डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांना ‘या’ पद्धतीने करा गुड बाय
पुणे : शलाका धर्माधिकारी – डोळा हा शरीराचा सर्वात नाजूक ज्ञानेंइंद्रिय आहे. त्यामुळे डोळ्यांची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायला हवी. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळच नाही तर तुमची झोप न येण्याची समस्याही दूर होईल. त्यासाठी तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करा.
झोप न लागणे, संगणकावरील काम, टीव्ही, मोबाइलचे व्यसन, अधिक विचार करणे ही सामान्य कारणे आहेत. आता डोळ्याचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी खालील उपाय करा.
१) ८ तास झोप घेणे आवश्यक आहे.
२) टीव्ही , मोबाईल यांचा अतिवापर टाळावा.
३) संगणकावर काम करताना झिरो नं. चा चष्मा वापरावा.
४) वाहन चालवताना काळ्या रंगाचा गॉगल वापरावा.
५) या सामान्य उपायांसह नाजूक डोळ्यावरून दिवसभराचा ताण नाहीसा करण्यासाठी रोज झोपताना रोज वॉटर आणि एलोवेरा जेलचा आपण उपयोग करणार आहोत. त्यासाठी एलोवेरा जेल आणि रोज वॉटर थंड मिळावेत. यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे. एका वाटीमध्ये रोज वॉटर आणि एलोवेरा जेल १ / ३ घेऊन त्या मिश्रणात कापसाच्या घड्या भिजवून त्या घड्या झोपताना डोळ्यावर ठेऊन झोपा. त्यामुळे काळी वर्तुळ एका आठवड्यात पूर्णपणे जातील आणि शांत झोप लागेल.