#WorldThyroidDay थायरॉईडग्रस्तांसाठी असा असावा आहार
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आज जागतिक थायरॉईड दिवस आहे. सध्या अनेकजणांना थायरॉइडची समस्या भेडसावते. थायरॉईड ही आपल्या शरीरातील एक महत्वाची ग्रंथी आहे. या ग्रंथीसाठी लागणारे उपयुक्त पोषक घटक अनेक खाद्यपदार्थांच्या माध्यमातून मिळतात. पण थायरॉईडग्रस्तांकरिता आहारात कोणते पदार्थ समावेश करावे याबाबत माहिती घेऊया.
थायरॉईड म्हणजे काय
आपल्या गळ्याच्या समोरील भागात एक ग्रंथी असते त्याला थायरॉईड म्हणतात. या ग्रंथीमार्फत हार्मोन्स तयार केले जातात. हे थायरॉईड हार्मोन्स शरीरातील हृदयाचे ठोके, चयापचय, तापमान या गोष्टी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.थायरॉईडच्या या ग्रंथीमधून जर हार्मोन्सचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर यामुळे थायरॉईडसंबंधीचे डिसॉर्डर होण्याची शक्यता आहे जसं की, हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड. वजन वाढणं, थकवा येणं,गोष्टी लक्षात न राहणं,नैराश्य,बद्धकोष्ठता,केसगळती,शारीरिक तापमानात असमतोल,कोरडी त्वचा,आवाज बदलणे अशा समस्या हायपोथारॉईडमध्ये आढळून येतात. तर हायपरथायरॉईडमध्ये वजन कमी होणं,थकवा जाणवणे,झोप न लागणे,सतत भूक लागणे,डायरिया,मासिक पाळी वेळेवर न येणं,थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढणं ,मानसिक स्वास्थ बिघडणं या तक्रारी समोर येतात.
हायपोथायरॉईड टाळण्यासाठी कसा असावा आहार
-आहारात कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थांचा समावेश करावा.
-नाचणी, बाजरी, ज्वारी, मासे. यामुळे शरीरात आयोडिनची कमतरता निर्माण होत नाही
-सलाड, अंड, चिकन, चिकन लिव्हर, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बिया हे पदार्थ देखील खावे
-भरपूर पाणी प्या
-धुम्रपान आणि मद्यपान करू नये.
-तेलकट पदार्थ खाणं टाळावं.
-कॅफेनचं सेवन करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
-तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दररोज व्यायाम करा
हायपरथायरॉईडला दूर ठेवण्यासाठी काय कराल
-आहारात कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थांचा समावेश करावा. नाचणी, बाजरी, ज्वारी, चिकन यांचाही आहारात समावेश करावा.
-३ ते ४ तासांनी सतत काहीतरी खात राहा
-पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा
-बेकरीतील आणि तेलकट पदार्थ तसंच शेंगदाणे खाणं टाळा
-तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दररोज व्यायाम करा