आरोग्यनामा ऑनलाईन टीम- अनेकांना मूळव्याध हा आजाराने ग्रासलेलं असते. हा आजार काही लोकांनाच होतो. तसेच अनुवंशिकतेने देखील हा आजार होऊ शकतो. परंतु, हा आजार खूप त्रासदायक आहे. या आजरावर आपण घरगुती उपाय केले. तर या गंभीर आजारांपासून आपली सुटका होऊ शकते.
१) या आजरात अचानक रक्त पडत असेल तर लगेच घाबरून जायचे काही कारण नाही. आणि हा आजार अंगावर काढणेही काही योग्य नाही. त्यासाठी दूर्वांच्या रसाबरोबर शतधौत घृत (१०० वेळा फेटलेले, धुतलेले तूप) गुदभागी लावावे.
२) मुळव्याधाचा त्रास जर जास्त जाणवत असेल तर चमचाभर ताजे, घरचे लोणी, नागकेशर चूर्ण व खडीसाखर हे मिश्रण घेतल्याने पडणारे रक्त थांबते.
३) चांगेरी, नागकेशर व नीळकमळ यांनी संस्कारित लाह्या पाण्यामध्ये शिजवून तयार केलेली पेज मूळव्याधीतून होणारा रक्तस्राव ताबडतोब थांबवते.
४) नारळाची शेंडी जाळून राख बनवा. तीन-तीन ग्रॅम ही राख सकाळ, दुपार, संध्याकाळ अनशापोटी ताकाबरोबर घ्या. एकदा घेतल्यावरच मूळव्याध बरा होतो. हा प्रयोग मासिक पाळीत अतिरक्तस्राव होत असल्यास उपयुक्त ठरतो.
५) एक कप गाईचे दूध पिण्यायोग्य गरम करून त्यात अर्धे लिंबू पिळून दूध नासायच्या आत ताबडतोब प्या. हा प्रयोगसुद्धा रक्तार्सातील रक्तस्राव ताबडतोब बंद करतो.
६) अर्धा ग्रॅम देशी कापूर एका केळ्याच्या तुकड्यात ठेवून अनशापोटी गिळून टाका. एकाच मात्रेत रक्तस्राव बंद होतो.