आरोग्यनामा ऑनलाईन- महिलांप्रमाणेच पुरुषांनाही त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुरुम, कोरडी त्वचा, ब्लॅकहेड्स किंवा अतिरिक्त तेलाची समस्या त्यांना असू शकतात. परंतु बर्याच जणांना निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी(glowing men’s skin) योग्य दिनचर्या माहित नसतात. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी, निरोगी आहार, जीवनशैली, स्किनकेअर रूटीन आणि पर्यावरणीय घटक जबाबदार आहेत. पुरुषांना सामान्यत: त्वचेचा त्रास होतो. पुरुषांसाठी त्वचा स्वच्छ(glowing men’s skin) करण्याचे काही सोपे मार्ग आहेत. आपण निरोगी आहार घेत असाल याची खात्री करुन घ्या जेणेकरून आपल्या त्वचेला आवश्यक पोषण मिळेल. जाणून घ्या या चार टिप्स..
1. आपल्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या.
महिलांप्रमाणेच पुरुषांना आपल्या त्वचेचा प्रकार माहित असणे आवश्यक आहे. त्वचा कोरडी, तेलकट किंवा मिश्र असू शकते. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य उत्पादन निवडल्यास फायदेशीर ठरू शकेल.
2. सीटीएम म्हणजे
सीटीएम म्हणजे क्लींजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग. आपण दिवसातून कमीतकमी दोनदा चेहरा स्वच्छ केला पाहिजे. टोनिंगसाठी आपण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार टोनर निवडू शकता किंवा गुलाबजल वापरू शकता. मॉइश्चरायझिंग अत्यंत महत्वाचे आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पाण्यावर आधारित मॉइश्चरायझर वापरा. तेल आधारित जाड मॉश्चरायझर कोरड्या त्वचेसाठी योग्य आहे.
4 सनस्क्रीन मलम जरूर लावा.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.