आरोग्यनामा ऑनलाईन टीम : आले(ginger) आपल्या स्वयंपाक घरातील एक मसाल्यातील पदार्थ.ज्याचा वापर फक्त भाजीचा स्वाद वाढविण्यासाठीच नव्हे तर चहा आणि काढ्यामध्ये सुद्धा वापरल्या जाते.आयुर्वेदिक डॉक्टर तर याला पचनातील शक्तिशाली औषध म्हणून वापरतात आणि सल्ला सुद्धा देतात.सुंठाचे लाडू आरोग्यदायी राहते हे आपण सर्वाना माहित आहे.परंतु जर आले(ginger) हे दुधात वापरून पिले तर आरोग्यासाठी चांगले राहील.आल्याच्या दुधात एंटी-इंफ्लेमेटरी, अँटीबैक्टीरियल आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात. आल्याचे दूध हे पौष्टिक आहार तसेच औषध आहे. जी सर्दी, विषाणू, फ्लू, संसर्गापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे.
आल्याचे दूध कसे तयार करावे
आल्याचा एक छोटासा तुकडा घ्या आणि बारीक वाटून घ्या आणि १ ग्लास दुधात मंद आचेवर थोडावे उकळवा. नंतर गाळून त्यात काही मध मिसळून प्या.
आल्याच्या दुधाचे फायदे
१ आल्याचे दूध दमा, खोकला, सर्दी, कफ, श्वासोच्छवासापासून मुक्त करते. दम्याचा त्रास असल्यास दररोज आलेचे पीस करून केलेले दूध किंवा चहा दोन्ही पिणे फायदेशीर आहे.
२. आल्याचा दुधाचा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. आल्याचे दूध अनेक प्रकारचे बॅक्टेरियांपासून संरक्षण करते. आणि रोगांविरूद्ध लढण्याची क्षमता निर्माण करते.
३. आल्याचे दूध पचन शक्ती वाढविण्यात फायदेशीर ठरते. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अपचनाची समस्या यामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी अदरक दूध प्या. आल्याचे दूध हळूहळू पोट संबंधित आजारांपासून मुक्त होण्यास मदत करते.
४. संधिवात पीडित व्यक्तीसाठी आल्याचे दूध पिणे खूप फायदेशीर आहे. आल्याच्या दुधामुळे शरीरात कॅल्शियम आणि पोटॅशियमची कमतरता सहजतेने कमी होते. ज्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. आणि गाठी सूजने आणि वेदना कमी होते.
५. सायनस कफ पासून पीडित व्यक्तीला दररोज आलेचे दूध पिणे फायदेशीर आहे. आल्याच्या दुधाचा चहा सायनसमधील कफ फायबर कमी करण्यास उपयुक्त आहे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.