• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

फक्त ७ दिवसांमध्ये वजन कमी करण्याचे प्रभावी ‘हे’ ११ उपाय

by Nagesh Suryawanshi
June 5, 2019
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
Obesity
463
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन – लठ्ठपणा एक आजार असून यामुळे इतर आजारांनाही आमंत्रण मिळते. हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका लठ्ठपणामुळे वाढतो. अनेकदा डायटिंग करून आणि जिममध्ये जाऊनही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा आहार व्यवस्थित नसतो. योग्य आहार आणि व्यायाम केल्याने वजन लवकर कमी होऊ शकते. सात दिवसात वजन कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत त्यांची माहिती घेवूयात.

पपईचे नियमित सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच दह्याचे सेवन केल्यानेही चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घेवून दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल. तसेच आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करावे. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

आणखी उपाय म्हणजे वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी ४ किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. रात्री साडेआठनंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाता ऐवजी डाळ आणि भाज्या असा हलका आहार घ्यावा. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ म्हणजेच बटाटे, मैदा, साखर, तांदूळ आदी कमी करावे. मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ म्हणजे डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई खाण्यावर जास्त भर द्यावा.

जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीत तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट, एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.दिवसभराच्या आहारात नाश्ता महत्वाचा आहे. वजन कमी करण्यासाठी नाश्ता टाळू नये. संशोधनानुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ घेऊ नयेत. दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील वसा कमी होण्यास मदत होते.

Tags: arogyanamaBodydietdiseasedoctorexerciseFoodhealthMedicineobesityआजारआरोग्यआरोग्यनामाआहारउपायऔषधडॉक्टरलठ्ठपणावजनव्यायामशरीर
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.