आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतो. यामुळे विविध प्रकारचे मानसिक आणि शारीरिक आजार होतात. मानसिक तणाव कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, कशी काळजी घ्यावी, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
1) गरजा कमी करा. कुठल्याही स्थितीत आनंदी राहा.
2) आजारी पडल्यास औषधे वेळेवर घ्या. आजारपणाबाबत जास्त चिंता करू नका.
3) संकट काळात हातात काहीच नसेल तर केवळ विचार करून वेळ घालवू नका.
4) घडणारे घडतेच, आणि न घडणारे कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा होत नाही, हे लक्षात ठेवा.
5) तणावात असताना आवडीचे संगीत ऐका. यामुळे मनाचा थकवा आणि तणाव कमी होईल.
6) नेहमी काम करा, कामाची चिंता करत बसू नका.
7) कामाचे नियोजन करा. नंतर कामाला सुरवात करा. एखादे काम पूर्ण होत नसेल तर अधिक प्रयत्न करा.
8) न मागता कुणालाही सल्ला देऊ नका.
9) आपलेच खरे अशा आविभर्वात वागू नका.
10) मुलांवर अवश्य नजर ठेवा, पण त्यांच्या सर्व गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नका.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)