आरोग्यानामा ऑनलाईन टीम : उचकी लागणे ही बाब सामान्य असली तरी कधीकधी ती सतत लागून राहील्यास खुप त्रास होतो. अनेकदा पाणी पिऊनही उचकी थांबत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यानंतर ही समस्या दूर होऊ शकते. हे उपाय कोणते ते आपण जाणून घेऊया.
हे उपाय करा
१ अंगठा
एका हातावर दुसऱ्या हाताच्या अंगठयाने जोरात दाबा. थोड्याच वेळात उचकी थांबते.
२ गाणी ऐका, नाचा
घरात असाल तर इयरफोन कानात टाका आणि गाणी ऐका. जमले तर नाचा.
३ श्वसन व्यायाम
नियमित श्वसनाचे व्यायाम करा.
४ मध
एक चमचा मधात थोडे कोमट पाणी टाकून ते प्यावे.
५ गोड पदार्थ
साखर, चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ खाल्ले तरी उचकी थांबते.
६ आंबट पदार्थ
लिंबू किंवा एखादे लोणचेही चाखल्यास उचकी थांबते. लिंब, कैरी, टॉमेटोच्या फोडी करून खाल्ल्यानेही उचकी थांबते.
७ चॉकलेट पावडर
एक चमचा चॉकलेट पावडर खा.
८ पीनट बटर
पीनट बटर खाताना दात व जीभेचा वापर होतो. यामुळे श्वसन प्रक्रियेत अडथळा येऊन उचकी थांबते.
९ काळीमिरी
तीन काळी मिरी आणि खडीसाखर तोडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. त्यावर एक घोट पाणी पण पिऊ शकता.
Visit : arogyanama.com