आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणतेही व्यसन हे आरोग्यासाठी घातकच असते. सिगारेटच्या पाकिटावर आरोग्याविषयी स्पष्ट सूचना आणि चित्र दर्शवलेले असतानाही अनेकजण सिगारेटचे व्यसन सोडू शकत नाहीत. हे व्यसन आरोग्यासाठी हानिकारक असते. यामुळे कँसर सारखे जीवघेणे आजार होतात. ही सवय सुटता सुटत नाही. सिगारेट सोडण्यासाठी काही खास योगासने आहेत. ही योगासने केल्याने सिगारेटची सवय लवकरच दूर होऊ शकते.
१ अनुलोम-विलोम
अनुलोम-विलोम प्रणायाम केल्याने मेंदू शांत राहतो. यासोबतच तंत्रिका तंत्र निरोगी राहते.
२ शवासन
सर्वात शेवटी शवासन करावे. यासाठी एकाग्रता आवश्यक असते. यामध्ये संपुर्ण शरीर सैल सोडून सरळ झोपावे लागते. हे आसन करताना आपली स्थिती शवाप्रमाणे होते.
३ सुखासन
सुखासन करताना पाठीचा कणा ताठ ठेवून, मांडी घालून बसावे. अनेक लोक टेंशनमुळे सिगारेट ओढतात. या आसनाने टेंशन दूर होण्यात मदत होते. तनाव दूर करण्यासाठी या आसनात बसावे.
४ कपालभाति प्राणायाम
कपालभाति प्राणायाम केल्याने शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. मस्तिष्काच्या कोशिकांनाही ऊर्जा मिळते. यामुळे इच्छाशक्ती मजबूत होते आणि सिगारेट सोडण्यास मदत होते.