मान अवघडली असेल तर करा ‘हे’ ४ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण रात्री झोपताना नीट झोपलो नाही, झोपताना मानेखाली उशी घेतली किंवा मानेला लचका बसला तर आपली मान अवघडते. त्यामुळे आपल्याला साधं वळूनही पाहता येत नाही. आणि मानेच्या वेदनाही खूप असह्य होतात. त्यामुळे मानेच्या या समस्येवर आपण काही घरगुती उपाय करू शकतो. तुमची जर मान अवघडली असेल तर तुम्ही खालील काही घरगुती उपाय करू शकता.

१) तुमची मान अवघडली असेल तर मानेच्या ज्या भागावर वेदना होत आहेत. त्याजागेवर जर दुखणारी जागा उजव्या बाजूला किंवा पाठीमागच्या बाजूला असेल तर उजवा आणि डाव्या दिशेला असेल तर डावा हात ठेवा.

२) त्या जागेवर हातांच्या बोटांनी विशिष्ट प्रेशरने दाबा. सुरवातीला तुम्हाला वेदना जाणवतील. मात्र नंतर आराम मिळेल.

३) दुखणार्‍या भागाच्या विरुद्ध दिशेने तुमची मान वळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिरक्या बाजूने डोके झुकवून हाताला हनुवटी चिटकवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू जखडलेला भाग मोकळा होण्यास आणि वेदना कमी होण्यास सुरवात होईल.

४) त्यानंतर मान आणि पाठीच्या वरच्या भागाला स्ट्रेचिंग द्या. असे केल्याने स्नायू हळूहळू मोकळे होण्यास मदत होईल. आणि तुम्हाला जर उशी घेतल्यामुळे त्रास होत असेल तर उशी घेऊ नका.